शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन संरक्षित करावीत - सावंतवाडीचे तालुका कृषि अधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 06 (जि.मा.का.) : दरवर्षी सातत्‍याने हवामानात होत असल्याने बदलाचा परीणाम फळपिकांवर व त्‍यांचे उत्‍पादनांवर होत असतो, अशावेळी शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक असलेली आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन शेतकऱ्यांनी संरक्षित करावीत. अधिक माहिती करिता क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन सावंतवाडीचे तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानांवर आधारित फळपिक विमा योजना आंबा बहार 2021-22 मध्ये सावंतवाडी तालुक्यातील 5000 शेतकऱ्यांनी 2274.31 हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये, आंबा फळपिकाचे 1346.99 हेक्टर क्षेत्रातील 3127 शेतकऱ्यांनी व काजू फळपिकांचे 927.32 हेक्टर क्षेत्रातील 1873 शेतकऱ्यांनी विमा उतरविण्यात आला होता. या फळपिकांचे विमा संरक्षण कालावधीत झालेल्या हवामान बदलांचे घटकांचे आधारे,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडून काजू फळपिकाची 4 कोटी 88 लाख रुपये व आंबा फळपिकाची 5 कोटी 6 लाख रुपये असे एकूण 9 कोटी 94 लाख रक्कम रुपये शेतकऱ्यांचे खाती विमा नुकसान भरपाई म्हणून अदा केलेली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'