शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन संरक्षित करावीत - दोडामार्ग तालुका कृषि अधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 07 (जि.मा.का.) : दरवर्षी सातत्याने हवामान बदल होत असल्याने या बदलाचा परिणाम फळ पिकांवर व त्यांचे उत्पादनांवर होत असतो, अशावेळी शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक असलेली आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन शेतकऱ्यांनी संरक्षित करावीत. अधिक माहिती करिता क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन दोडामार्ग तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानांवर आधारित फळपिक विमा योजना आंबा बहार 2021-22 मध्ये दोडामार्ग तालुक्यातील 653 शेतकऱ्यांनी 323 हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये आंबा फळपिकाचे 21 हेक्टर क्षेत्रातील 43 शेतकऱ्यांनी व काजू फळपिकाचे 302 हेक्टर क्षेत्रातील 610 शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. फळपिकांचे विमा संरक्षण कालावधीत झालेल्या हवामान बदलांचे घटकांचे आधारे,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडून काजू फळपिकाची 1 कोटी 37 लाख 28 हजार 824 रुपये व आंबा फळपिकाची 8 कोटी 3 हजार 575 रुपये असे एकूण 1 कोटी 45 लाख 32 हजार 399 रक्कम रुपये शेतकऱ्यांचे खाती विमा नुकसान भरपाई म्हणून अदा केलेली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'