इतर मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थीनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): इतर मागासवर्गीय (ओबीसी) महामंडळाच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येईल. लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रुपये 10 टक्के लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेतंर्गत तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येईल. तरी संबंधितांनी कर्ज खातेधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय येथे 02362-2288119, 8668898950 या दूरध्वनी क्रमांवर संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'