अनुदानित क्रीडा प्रकारच्या एकविध खेळ संघटनेची बैठक 17 ऑक्टोबर रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का): सन 2022-23 च्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुदानित क्रीडा प्रकारच्या एकविध खेळ संघटनेची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या अध्यक्षखाली सोमवार दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष/सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस उपस्थित राहतांना जिल्हास्तर एकविध क्रीडा संघटना नोंदणी प्रमाणपत्र,जिल्हास्तर संघटना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे पत्र सोबत आणावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविलेले आहे. आर्चरी, क्रीकेट, कबड्डी, शुटींगबॉल, वेटलिफ्टींग, ॲथलॅटिक्स, सायकलिंग, कराटे, सिकई मार्शल आर्ट, कुस्ती, बॅडमिंटन, डॉजबॉल, खो-खो, सॉफ्टबॉल, वुशु, बॉलबॅडमिंटन, तलवारबाजी, किकबॉक्सींग, स्कॅश, योगासन, बेसबॉल, फुटबॉल, लॅानटेनिस, जलतरण डायव्हिंग, रग्बी, बास्केटबॉल, जिमनॅस्टीक, मल्लखांब, टेबल टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, बॉक्सींग, हॅण्डबॉल, नेटबॉल, तायक्वाँदो, सेपक टकरा, कॅरम, हॉकी, रायफल शुटींग, थ्रोबॉल, सॉफ्टटेनिस, बुध्दीबळ, ज्युदो, रोलबॉल, व्हॉलबॉल, टेनिक्वॉईट, आटयापाटया,वॉटरपोलो. या खेळ प्रकारातील संबंधित खेळाच्या संघटनानी यांची नोंद घ्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'