ई- पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठी 22 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ -प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : जिल्ह्यात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी पूर्ण करता आली नाही.अशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद करुन घ्यावी यासाठी 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदवाढ देण्यात आल्या असत्याचे माहिती प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम 2022 चे ई-पीक पाहणी ॲपवर नोंद विहित कालावधीत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सध्या खरीप 2022 हंगामाची पीक पहाणीची कार्यवाही सुरु आहे. खरीप हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक चे 2.0.4 हे उपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. खरिप हंगाम 2022 ची ई- पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल ॲपव्दारे करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली ई- पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्त सो. पुणे यांचे मान्यतेने मोबाईल ॲपव्दारे शेतकरी स्तरावरील ई- पीक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
00000
Comments
Post a Comment