तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 ऑक्टोबरपर्यंत भरावे

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे मनुष्यबळाचे तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दीने भरावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे, प्र.सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्यवे कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थानेत काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर-1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाईचे विवरणपत्र ई आर -1 दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणवी येत असतील अशांनी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362, 228835 वर संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'