सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन साजरा
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्थापना दि. 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला आता 90 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन साजरा
विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सहायक लेखाधिकारी, महिला बाल कल्याण मधील कर्मचारी संजय पवार यांच्य हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आनंद कर्पे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करीत असताना सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेचा इतिहासाबाबत थोडक्यात माहिती दिली. जिल्हा जात पडताळणी विभागाचे कर्मचारी कदम यांनी उपस्थितांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रपूरुषांच्या कार्याबाबत माहिती सांगून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनोची माहिती दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी लाभार्थी प्रगती प्रकाश देसाई हिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
प्रमुख वक्ते ॲड रुपाली प्रभू यांनी महिला सक्षमीकरण, सबळीकरण तसेच कौटुंबिक हिंसाचार याबाबतच्या कायदे विषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्या चैतन्य सरोदे, यांनी आपले स्वाधार- शिष्यवृत्तीमुळे आपणास आतापर्यंतचे शिक्षण घेता आले असे मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थीनी प्रतिक्षा घाटगे व ऋतुजा नाईक यांनीही शिष्यवृत्तीमुळे आपणास घरची परिस्थिती नसतांनाही उच्च शिक्षण घेता आले असे मनोगत व्यक्त केले. महिला बाल कल्याण कार्यालयातील संजय पवार यांनी समाज कल्याण विभागाबाबत माहिती दिली. आनंद कर्पे मुख्याध्यापक आश्रमशाळा बोर्डवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यी- विद्यार्थ्यांनी, अधिकारी व कर्मचारी वर्ग, ॲड. रुपाली प्रभू ,महिला बालकल्याणचे संजय पवार सर्वांचे आधार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
00000
Comments
Post a Comment