असंघटित कामगारांनी ई-श्रम कार्डची जास्तीत जास्त नोंदणी करुन घ्यावी.

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): केंद्र सरकारमार्फत असंघटित कामगारांची माहिती एका राष्ट्रीय डेटा बेसमध्ये साठविण्साठी ई-श्रम पोर्टल विकसीत करण्यात आलेले आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी आपल्या नजिकच्या नागरी सुविधा केंद्र(CSC) मध्ये जाऊन किंवा eShram portal URL: eshram.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य आपले ई-श्रम कार्डची जास्तीत जास्त नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. असंघटीत कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घरेलू कामगार, हातगाडीवाले, बिडी कामगार, भाजी व फळ विक्रेते, सुतार कामगार, मच्छीमार या सारख्या विविध 300 प्रकारच्या व्यवसायाच्या गटातील कामगारांचा सामावेश होत आहे. केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. कामगार 16 ते 59 वयोगटातील असावा. भविष्यनिर्वाह निधी व कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. आयकरदाता नसावा. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आधारकार्ड, बॅकपासबुक, आधारलिक, मोबाईल क्रमांक, वयाचा पुरवा.अशा असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी आपल्या नजिकच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन किंवा eShram portal URL: eshram.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य आपले ई-श्रम कार्डची जास्तीत जास्त नोंदणी करुन घ्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'