समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा, शुक्रवारी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा, सिंधुदुर्गनगरी येथे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे असून या कार्यक्रमास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड डॉ. भुषणकुमार उपाध्याय हे प्रमुख अतिथी आहेत. विशेष उपस्थिती खासदार, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकरी अधिकारी, प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आहेत. असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'