सावंतवाडीत 14 ऑक्टोबरला रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. उद्योजकांनी आपल्या आस्थापनेवार असलेली रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत. ज्या उद्योग आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम पोर्टलवर नोंदणी करुन रिक्तपदे अधिसूचित करावीत. उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये रिक्तपदे अधिसूचित केल्यानंतर नोकरी साधक (JOB SEEKER)उमेदवारांनी वरिल पोर्टलवर स्वत:च्या लॉगीनने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ॲप्लाई करावे. दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 02362 228835,9403350689 वर संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'