शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र नोंदणीसाठी 21 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) : शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाचे आहे. त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरु केले आहे. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यात 41 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरु केली आहेत. शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.एस. देसाई यांनी दिली . राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता दि- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. शासनाच्या सूचनानूसार खरीप पणन हंगाम 2022-23 करिता शासनाचे एफ.ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता 2 हजार 40 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. सदर धान खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक केंद्राकरिता स्वतंत्र आयडी तयार करुन संस्थाना दिलेला आहे. नोंदणी करिता चालु खरीप हंगाम 2022-23 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मुळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्सची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रावर नोंदणे करणे करिता शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहणे गरजेचे आहे. करण शासनने सदर हंगाम प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा फोटो नोंदणीवेळी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस व्दारे नोंदणी क्रमांक दिला जातो. भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस व्दारे खरेदी करिता बोलविण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष धानाची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करयात येईल. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ लि मार्फत सावंतवाडी,मळगाव,मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सूली, तळवडे, भेडशी. कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे,निवजे, आंब्रड, पिंगूळी, पणदूर, कडावल, तुळस, वेताळ बांबार्डे, गोटोस, निरुखे. शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि कणकवली. मार्फत कणकवली, लोरे नं.1 फोंडा, घोणसरी, सांगवे. वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला,होडावडा.देवगड तालुका खरेदी विक्री संघ. लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. मालवण तालुका खेरदी विक्री संघ लि. मार्फत पेंडूर, गोठणे, विरण,मालवण. वैभववाडी तालुका खरेदी विक्र संघ लि मार्फत वैभववाडी, करुळ. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह. संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा,मसुरे येथे नोंदणी केंद्र सुरु केलेली आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सातबारा मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री देसाई यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'