स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुरस्कार प्राप्त टिमचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.) : स्वच्छ भारत मिशन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व यंत्रणेचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा तसेच मालवण नगरपरिषदेची यंत्रणा यांचे अभिनंदन करुन आपल्या जिल्ह्याच्या यंत्रणेचे हे यश सातत्याने टिकवून ठेवा.अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.यावेळी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.जयकृष्ण फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment