मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रक्रियेस सुरुवात विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटी पोर्टवर अर्ज भरण्याचे आहवान

सिंधुदुर्गनगरी, दि. 06 (जि.मा.का.) : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्याना निर्वाहभत्ता योजननेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत अनुसूचित जाती, इमाव,विजाभज,व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यायांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरण्यासंदर्भात कार्यशाळा घेवून परिपत्रक शाळा, माविद्यालायांच्या नोटीस बोर्डावर दर्शनी भागात लावण्यात यावी. तसेच मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेवर भरुन घेण्याबाबत व महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी करुन प्रस्ताव मंजूरीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वेळेवर पाठविण्यातबाबत महाविद्यालयांना सूचित करण्यात येत आहे. या योजनेपासून मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'