देशाच्या दरडोई उत्पन्नात जिल्ह्याचा सहभाग महत्त्वाचा अधिकाऱ्यांनी लोकांच्या हिताची कामे सकारात्मकतेने करावीत -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आपणा सर्वांना घडवायचा आहे. देशाचा जीडीपी वाढला पाहिजे, त्यामध्ये जिल्ह्याचे योगदान वाढले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विभागांनी स्वत:ची संकल्पना राबवून जिल्ह्याचे नियोजन तयार करावे. मानसिकतेत बदल करुन अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून आणि पारदर्शकपणे लोकांच्या हिताची कामे करावीत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात आज सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली. आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली उपस्थित होते. सर्व विभागांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी काम करताना आपल्या चांगल्या कल्पना, संकल्पना वापरुन जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन तयार करावे. जिल्ह्यातून ऑलंपिकसाठी खेळाडू जातील त्यासाठी काय करता येईल. रोजगार निर्मितीसाठी कसे युनिट तयार करता येईल याचा समावेश असावा. इथला युवक स्थलांतरीत होणार नाही यासाठी कृषी, औद्योगिक क्षेत्रात वेगळेपण निर्माण करावे. या जिल्ह्यासाठी सेवा देताना आपल्या कालावधीत जिल्ह्याला काहीतरी देवून जायचं ही भावना हवी. अधिकाऱ्यांनी आपल्या मानसिकतेत बदल करावा व त्यावा उपयोग ताकदीने उद्दिष्टपूर्तीसाठी करावा. कोणाची कामे घ्यायची, कोणती काम करायंची, जो देईल त्याची कामं घ्यायची ही प्रथा बंद झाली पाहिजे, लोकांच्या हिताची कामे झाली पाहिजेत. हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करु. जिल्ह्यात पाठीमागे काय झाले, यापेक्षा पुढे काय करायचे या विषयी अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल करावा असेही पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले. आमदार श्री. राणे यांनी यावेळी कामांचे प्रस्ताव तयार करताना अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी. महावितरणमध्ये कर्मचारी भरती करावी. तसेच डोंगरी विकास कार्यक्रमालाही मंजूरी द्यावी अशी मागणी केली. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी यावेळी स्वागत करुन विभागनिहाय विषय मांडले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शेवटी आभार मानले. -सोबत फोटो

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'