महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण प्रसिद्ध; गुरुवारपर्यंत अभिप्राय पाठवावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) – राज्याच्या चौथे महिला धोरण दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाले आहे. या धोरणाच्या मसुद्याची मराठी भाषेतील प्रत दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या सुलभ संदर्भासाठी व अभिप्रायांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याच्या सुधारीत महिला धोरणाच्या प्ररुप मसुद्याबाबतचे नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. नागरिकांनी त्यांचे अभिप्राय महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या mahilavikas2021@gmail.com या ई-मेलवर दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन राहुल मोरे, आयुक्त, महिला व बाल विकास यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'