14 मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग पोस्ट खात्यामार्फत सोमवार 14 मार्च 2022 रोजी अधिक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पोस्ट विभागाचे अधिक्षक, आ.ब.कोड्डा यांनी दिली.
पोस्ट खात्याच्या विविध सेवेबाबत टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर इत्यादी सेवेबाबतच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. यासाठी तक्रार दाराने आपली तक्रार तपशिलासह तारीख, अधिकारी, नाव, हुद्दा इत्यादी माहितीसह आपली तक्रार शुक्रवार दि. 4 मार्च 2022 पर्यंत आ.ब.कोड्डा, अधिक्षक, डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्या नावे पाठविण्यात यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग डाकघर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment