दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त अभिवादन
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय व मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
* सोबत फोटो जोडल आहे.
००००
Comments
Post a Comment