शामराव पेजे महामंडळाची एकरकमी परतावा योजना; व्याज रकमेवर 2 टक्के सुट

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – शामराव पेजे कोकण इतर मागासावर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थींसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर 2 टक्के सूट देण्यात येईल. ही योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यानंतर महामंडळाच्या नवीन 10 लाख रुपये व्याज परताना योजनेंतर्गत लाभ घेता येईल. तरी संबंधितांनी योजनेचा लाभ घेऊ थकीत कर्जाची परतफेड करावी व कर्ज खाते बंद करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापन प्रिती पटेल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, दूरध्वनी क्र. 02362-228119 येथे संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'