संकरीत गायी पैदास करण्याचे उद्दीष्ट मार्च अखेर पूर्ण करा - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) – कृत्रीम रेतनाद्वारे संकरीत गायी पैदास करण्याचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आज पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठकीवेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी आमदार दीपक केसरकर, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशित सह उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे, मुंबई शहर उपायुक्त डॉ. शैलेश पेठे, पालघरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंजाब चव्हाण, ठाण्याचे पशुसंवर्धन अधिकारी समिर तोडकर, रायगडचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम, सिंधुदुर्गचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ, रविंद्र दळवी, रायगडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे, रत्नागिरीचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जगदाळे, सिंधुदुर्गचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंदे,पशुधन विकास अधिकारी डॉ.विद्यानंद देसाई व डॉ.तुषार वेर्लेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. केदार म्हणाले, ज्याप्रमाणे शेळीच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच इतर पशुधनाच्या किमतीमध्येही वाढ करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करा. जिल्ह्यातील पशुधन वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावेत. कुक्कुटपालना वाढीसाठीही प्रयत्न करावेत. योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज भासल्यास त्याप्रमाणे बदलाचे प्रस्ताव सादर करा. जिल्ह्यात मागणी असलेल्या गायींची उपलब्धता वाढवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्याचे उपायुक्त डॉ.दळवी यांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा दिला. तसेच जिल्ह्यातील पशुधन, चारा उपलब्धता याविषयी सविस्तर माहिती सादर केली. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'