"माझे मत माझे भविष्य - एका मताचे सामर्थ्य" राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा
"माझे मत माझे भविष्य - एका मताचे सामर्थ्य" राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पडवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सन 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य - एका मताचे सामर्थ्य" या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. तसेच सामुहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकुरांचा गौरव करणे हा या स्पर्धांचा उद्देश आहे.
यामध्ये गीत स्पर्धा, व्हीडिओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा समावेष आहे. या स्पर्धांमध्ये संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी अशा श्रेणी असून त्यासाठी 3 हजार रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतची बक्षीसे आहेत.
स्पर्धकांनी तपशीलवार मार्दगर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलासह voter-contest@eci.gov.in येथे ई-मेल कराव्यात. ई-मेल करताना स्पर्धेचे नाव व श्रेणी यांचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका स्पर्धकांच्या तपशीलासह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर दि. 15 मार्च 2022 पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment