10 मार्च रोजी पणजी येथे डाक अदालतीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का) : पोस्टमास्तर जनरल, पणजी-गोवा यांच्यामार्फत गुरुवार 10 मार्च 2022 रोजी पोस्टमास्तर जनरल, पणजी-गोवा यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पोस्ट विभागाचे अधिक्षक, आ.ब.कोड्डा यांनी दिली.
पोस्ट खात्याच्या विविध सेवेबाबत टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर इत्यादी सेवेबाबतच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. यासाठी तक्रार दाराने आपली तक्रार तपशिलासह तारीख, अधिकारी, नाव, हुद्दा इत्यादी माहितीसह आपली तक्रार शुक्रवार दि. 1 मार्च 2022 पर्यंत रमेश प्रभू, सेक्रेटरी, डाक अदालत आणि सहाय्यक डाकनिदेशक, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी-गोवा यांच्या नावे पाठविण्यात यावी, असे आवाहन पोस्ट विभागाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment