10 वी व 12 वी परीक्षांसाठी समुपदेशांची नेमणूक

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) – मार्च / एप्रिल 2022 च्या उच्य माध्यमिक 12 वी परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( 10 वी ) परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी श्री. एन.आर.माने, अनंत कृष्णा केळकर हायस्कूल, वाडा, ता. देवगड भ्रमणध्वनी 9420929648, 9657495281 या समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सेवा दि. 4 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी तसेच पालक यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांची हेल्पलाईन सेवेकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे. भावना राजनोर, सहसचिव - 8806512288, एस.एल.हावळ, वरिष्ठ अधीक्षक (12 वी) तथा प्र. सहाय्यक सचिव - 9890772229, डी.पी.पोवार, वरिष्ठ अधीक्षक (10 वी) 8830384044, एन.एम.जोशी, सहाय्यक अधीक्षक (10 वी) - 9823484725, हेल्पलाईन क्रमांक - 02352-228480, 231250. तरी विद्यार्थी, पालकांना मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी मंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन सत्यवान सोनवणे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'