विशेष सहाय्यक अभियोक्ता नेमणूक मंडळासाठी 7 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील मुख्य न्याय दंडाधिकारी व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 25 (3) अन्वये एकूण चार विशेष सहाय्यक अभियोक्त्यांच्या तात्पुरत्या नेमणूका करण्यासाठी मंडळ (पॅनेल ) तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून 7 मार्च 2022 रोजीपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या अधिसूचनेनुसार मंडळ (पॅनेल) साठी पुढील अटींची पुर्तता होणे आवश्यक आहे. अर्जदार भारताचा नागरिक असावा. अर्जदाराने कोणत्याही शासकीय मान्यप्राप्त विद्यापिठाची कायद्याची पदवी संपादन केलेली असावी. अर्जदाराचे दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजीचे वय 55 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. अर्जादारास उच्च न्यायालय किंवा त्याच्या दुय्यम न्यायालयात कमीत कमी 5 वर्ष वकिली केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार मानधन स्वीकारणे बंधनकारक राहील. सदरचे पॅनेल तात्पुरती व्यवस्था म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याने पॅनेलमधील नियुक्ती केलेल्या वकिलांना निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी इत्यादी शासकीय लाभ अनुज्ञेय राहणार नाही. तरी इच्छुक उमेदवारांनी साध्या कागदावर, त्यांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्मतारीख, जन्मठिकाण, वय, अनुभव, न्यायालयात वकिली केल्याचा कालावधी, वकिली व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक नमुद करून त्या पुष्ठ्यार्थ पुराव्याचे कागदपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, कायद्याची पदवी संपादन केल्याचे प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, वकिली व्यवसायातील अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती अर्जासोबत जोडून जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या नावे अर्ज दि. 7 मार्च 2022 रोजीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पोहोचतील असे पाठवावेत. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असेही या अधिसूचनेमध्ये नमुद केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'