12 वी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षा मार्च - एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजलेपासून कॉलेज लॉगिनमध्ये डाऊनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. याबाबत काही अडचणी असल्यास शाळा व महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने पुढीलसूचना मंडळाने केल्या आहेत. 1)मार्च - एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. 12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. 2) प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. 3) प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. 4) प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भात दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. 5) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. 6) फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी मार्च - एप्रिल 2022 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी ) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी याची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'