निर्लेखित जडसंग्रहाच्या विक्रीसाठी निविदा पाठवण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयातील निर्लेखित जडसंग्रह साहित्याची परपत्रक पद्धतीने विक्री करण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.एफ. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे. सदर साहित्य ज्या खरेदीदारात विकत घ्यावयाचे आहे त्यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय येथे दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रते सिलबंद लिफाफ्यात पाठवावीत.
निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता नमुद करावा. दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी नंतर आलेल्या निविदांचा स्वीकार केला जाणार नाही. निविदा दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 5 वाजता उघण्यात येतील.
सदर विक्री करावयाचे निर्लेखित जड संग्रह साहित्या कार्यालयाच्या हॉलमध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यलयीन वेळेत सकाळी 10.30 ते 5 वा.पर्यंत पाहता येईल. सदर निर्लेखित जडसंग्रह साहित्य हे आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी.
याविषयीच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. ज्या खरेदीदाराचा साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरहू साहित्याची विक्री केली जाईल. ज्या दर मंजुर होईल त्याला ताबडतोब योग्य रक्कम भरून साहित्य स्वखर्चाने घेवून जावा लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा, विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्वीकारणे अथवा नाकारणेचे अधिकार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.
00000
Comments
Post a Comment