22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गच्यावतीने दि. 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2022 दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, परंतु ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशा उद्योजकांनी पोर्टलद्वारे त्यांची नोंदणी करुन रुक्तपदे पोस्ट करावीत. नोकरी साधक उमेदवारांनी पोर्टलवर त्यांच्या लॉगीन आयडीने शौक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अप्लाय करावे. ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांना उद्योजक मुलाखतीसाठी ऑनलाईन तारीख व वेळ देऊन ऑनलाईन मुलाखत घेऊन अंतिम निवड करु शकतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक तसेच उमेदवारांनी ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन शा.गि. पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02362-228835, 9403350689, ई-मेल -sindhudurgrojgar@gmail.com येथे संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'