कणकवली येथे २४ मार्च रोजी 'खरेदीदार-विक्रेता' (Buyer-Seller) संमेलनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २२ (जिमाका) :- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी, २४ मार्च २०२६ रोजी 'खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सकाळी ०९ ते सायंकाळी ६ या वेळेत कणकवली कॉलेज, कणकवली येथे संपन्न होणार असून खरेदीदार विक्रेता यांचे करार दुपारी ३ ते ६ या वेळेत होतील. संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये: 1) थेट बाजारपेठ: प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट मोठ्या खरेदीदारांसमोर (Big Buyers/Retailers) सादर करण्याची संधी मिळेल. २) व्यावसायिक करार: खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सामंजस्य करार (MoU) घडवून आणण्यासाठी विशेष व्यासपीठ. ३) मार्गदर्शन कार्यशाळा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पिके जसे की काजू, कोकम, आंबा आणि फणस यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग आणि पॅकेजिंग यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र. ४) व्यवसाय विस्तार: नवीन व्यवसाय संधी आणि थेट व्यवहार करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन. सहभागासाठी आवाहन या संमेलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सूक्ष्म अन्न प्रक्रियादार, शेतकरी गट आणि खरेदीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'