जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे महिला दिन संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय संकुलातील सर्व महिला अधिकारी, वकील व कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे उत्साहत आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्या देशमुख, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अॅड. प्रणिता कोटकर यांनी 'स्त्री शक्तीचा सन्मान' हा संदेश देत या कार्यक्रमात खेळांच्या माध्यमातून विरंगुळा आणि भाषणांतून प्रबोधन करण्यात आले. खेळ आणि आनंददायी वातावरण दैनंदिन न्यायालयीन कामकाजाच्या व्यापातून वेळ काढत महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रश्नमंजुषा आणि अन्य मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळांमधील चुरस आणि महिलांचा उत्साह यामुळे न्यायालयीन परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता. विजेत्या महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. केवळ खेळच नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी विशेष भाषणांचे सत्रही पार पडले.
यावेळी "न्यायदानातील महिलांचे योगदान" आणि "समाजातील महिलांचे स्थान" यावर प्रकाश टाकला, महिलांनी स्वतःचे हक्क ओळखून सक्षम व्हावे, असे आवाहन उपस्थित श्रीमती विद्या देशमुख, जिल्हा न्यायाधीश - 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी केले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, म्हणाल्या की, महिलांनी स्वतः पुढे आले पाहिजे जो पर्यंत आपण पुढे येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही. आपण आपल्याला सक्षम बनवल पाहिजे असे आवाहन उपस्थित महिलांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रणिता कोटकर तर प्रास्ताविक अॅड. रुचा लोखंडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन अॅड. श्वेता तेंडूलकर यांनी केले.
००००००
Comments
Post a Comment