छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जिल्हाभरात ७ मार्च रोजी शिबिरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि ०४ (जिमाका) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात ७ मार्च रोजी एक दिवसीय शिबिरांचे मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/ नगर पंचायत स्तरावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, इलेक्ट्रॉनिक माध्यम संघटनेचे अध्यक्ष विशाल रेवडेकर, दैनिक पुढारीचे अवृत्ती प्रमुख गणेश जेठे, बाळ खडपकर, लऊ म्हाडेश्वर, संदीप गावडे, नंदकुमार आयरे,दत्तप्रसाद वालावलकर,संजय वालावलकर, विनोद दळवी, मनोज वारंग, तेजस्विनी काळसेकर, विशाल रेवडेकर, सतिष हरमलकर आदी. विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात एकूण मंडळांची संख्या ५७ आहे तर ८ नगर परिषद/नगर पंचायती अस्तित्वात आहेत. या शिबिराच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. या अभियानामध्ये जिल्हास्तरीय विभागांना शिबिरामध्ये सहभागी होणेकरीता निर्देशित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारीर यांची नेमणूक प्रत्येक तालुकाकरीता नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली असल्याचेही त्या म्हणाल्या. ७ मार्च रोजी आयोजित शिबिरांचे ठिकाण - सावंतवाडी-बांदा ग्रामपंचायत कार्यालय, बांदा, वेंगुर्ला- वेतोरे- साई योगेश्वर मंगल कार्यालय, वेतोरे, दोडामार्ग-भेडशी- ग्रामपंचायत साटेली भेडशी समोर गणपती मंदिर हॉल, कुडाळ- वालावल- मंडळ अधिकारी कार्यालय, वालावल, मालवण-आंबेरी- चौके हायस्कुल चौक, कणकवली-वागदे ग्रामपंचायत कार्यालय- वागदे., वैभववाडी- वैभववाडी (नगरपंचायत क्षेत्र वगळून) जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर-1. देवगड- शिरगाव, शिरगाव कॉलेज शिरगाव या मोहिमेमध्‍ये पुढील सेवा प्राधान्‍याने देण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना १) प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे. २) अभिलेख दुरुस्‍ती ३) लोकसेवा हक्‍क कायद्यांतर्गत येणा-या अर्जाचा निपटारा ४) अकृषिक तरतुदीसंदर्भातील नव्‍याने प्राप्‍त सुधारणांबाबत मार्गदर्शन ५) भूसंपादन केलेल्‍या व अकृषिक परवानगी देण्‍यात आलेल्‍या प्रकरणांची कमी जास्‍त पत्रके तयार करुन गांव दप्‍तर अद्ययावत करणे. ६) भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्‍ये रुपांतर करणे. ७) सर्व गावामध्‍ये ७/१२ वाचन पूर्ण करुन प्रलंबित नोंदीच्‍या याद्या तयार करुन त्‍यानुषंगाने दुरुस्‍तीबाबत कार्यवाही पूर्ण करणे. ८) सामाजिक अर्थसहाय योजना अंतर्ग पात्र लाभार्थ्‍यांचे अर्ज भरुन घेऊन मंजूरीबाबत कार्यवाही पूर्ण करुन शिबिरामध्‍ये आदेशाचे वितरण करणे. ९) प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्‍या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्‍यवहार व हस्‍तांतरणबाबत गांवनिहाय यादी तयार करुन अशा अनोंदणीकृत व्‍यवहाराविषयी माहिती जमा करणे. आणि अशी माहिती नोंदणीकरीता नोंदणीविभागाकडे पाठविणे. व त्‍यानुषंगाने ७/१२ अद्ययावत करुन त्‍याचे वाटप करणे. १०) शाळामध्‍ये कॅम्‍प मोडमध्‍ये विद्यार्थ्‍यांकडून परिपूर्ण अर्ज भरुन घेऊन दाखल्‍याचे वाटप करणे. (यापूर्वी सेवा पंधरवडयाचे अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्‍हयात ५७५६३ वय व अधिवास प्रमाणपत्रांचे यापूर्वीच वाटप झालेले आहे. तसेच एकूण १६३४ प्राथमिक तसेच माध्‍यमिक शाळांपैकी १४२० शाळांमध्‍ये वय व अधिवास प्रमाणपत्राचे १००% वाटप पूर्ण झालेले आहे. तसेच एकूण ७०३० विद्यार्थ्‍यांना जातीच्‍या प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आलेले आहेत. ११) पाणंद रस्‍त्‍याची प्रशासकीय मान्‍यतेचे आदेश दिनांक १४/१२/२०२५ च्‍या शासन निर्णयानुसार उपविभाग स्‍तरीय समितीने ग्रामपंचायतला उपलब्‍ध करुन देणे. १२) सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टेवाटपाची कार्यवाही पूर्ण करणे. ००० ०००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'