गुणवंत विद्यार्थ्यांचा कर्नाटक राज्य अभ्यास दौरा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

सिंधुदुर्गनगरी दिनाक 10 (जिमाका) :- समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-26 या उपक्रमांतर्गत Exposure Visits Outside the State या सहलीसाठी ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस (Reward) देण्यासाठी तसेच यावर्षी प्रथमच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी औद्योगिक क्षेत्र भेटीसाठी सूचना केल्या त्यानुसार बेळगाव येथील मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड तसेच Atlas कंपनीला विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती (प्राथमिक) शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली आहे. आज दि. १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यास दौऱ्यास शुभेच्छा दिल्या. या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वी मधील २२ मुलगे व २३ मुली असे एकूण ४५ गुणवंत विद्यार्थी दि. १० मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत कर्नाटक राज्यातील बेळगाव व बेंगळुरू येथे सहल आयोजित करण्यात आली आहे. सहलीच्या पहिल्या दिवस:- सिंधुदुर्गनगरी ते बेळगाव असा एस.टी.ने प्रवास करून उद्यमबाग बेळगाव इंडस्ट्रियल (औद्योगिक भेट) रात्री 10 च्या ट्रेन ने बेळगाव ते बेंगलोरसाठी प्रवास. दुसऱ्या दिवस:- बेंगलोर येथे लालबाग बॉटनिकल गार्डन, बेंगलोर येथील इस्रो सेंटर, हिंदुस्थान एरोनॉटिकल आणि विश्वेश्वरा इंडस्ट्रियल अॅण्ड टेक्नोलॉजिकल म्युझियम. तिसरा दिवस:- बानेरगठ्ठा झू, कब्बन पार्क व परतीचा प्रवास भेट देऊन चौथ्या दिवस :- बेंगलोर ते बेळगाव आणि बेळगाव ते सिंधुदुर्गनगरी असा परतीचा प्रवास होणार आहे. या अंतर्गत आपल्या राज्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण घेवाण, सांस्कृतीक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्याच्या सामान्य ज्ञानात सुद्धा वृद्धी होण्यासाठी मदत होणार आहे. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत महेश पालव, उपशिक्षक, जि.प. शाळा सावंतवाडी क्र.४, महेश नाईक, उपशिक्षक (जि.प. शाळा बोर्डवे), श्रीमती स्नेहलता राणे, उपशिक्षिका, जि.प. शाळा सांगुळवाडी , श्रीमती. दिपाली सावंत, उपशिक्षिका, जि.प. शाळा माणगाव नं.२, तसेच श्रीमती स्मिता नलावडे, जिल्हा समन्वयक (नियोजन व नियंत्रण) या जिल्हा प्रतिनिधी म्हणून सोबत उपस्थित राहणार आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'