‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अॅथलेटिक्स खेळाडू निवड चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता सद्यस्थितीत अॅथलेटिक्स, या खेळांकरिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील क्रीडा प्रतिभा विकास केंद्र हे अनिवासी केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी https://forms.gle/४kq६VfWkoJrcAvUh८ या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित होण्याच्या दृष्टीने मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खेळाडूंनी खालील मूळ कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. १) जन्मदाखला २) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३) अधिवास प्रमाणपत्र ४) आधार कार्ड ५) गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र ६) शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ७) क्रीडा कामगिरी (अॅथलेटिक्स (मैदानी) या खेळाचे राज्य/राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र) खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे. उपरोक्त प्रमाणे जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या प्रवेशाकरिता निवड चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित केला असून दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी आवश्यक क्रीडा साहित्यासह उपस्थित रहावे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंना निवड चाचणीकरिता उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात येत आहे. (संपर्कासाठी मोबाईल क्र- ९८६७६९९२८१). जिल्ह्यातील जास्तीत जास्त संबंधित खेळातील अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'