मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी एच.पी.व्ही. लसीकरण आवश्यक – जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी दिनाक 09 (जिमाका) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती. तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील पात्र वयोगटातील मुलींना त्यांच्या सुरक्षित आरोग्यसाठी एच.पी.व्ही. (Human Papilloma Virus) लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी एच.पी.व्ही. लसीकरण अत्यंत प्रभावी व सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून ती सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले की, एच.पी.व्ही. लसीकरणामुळे मासिक पाळीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, तसेच प्रजनन क्षमतेवरही कोणताही परिणाम होत नाही. या संदर्भात समाजात पसरलेल्या चुकीच्या समजुतींना बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाची माहिती : * पात्रता : 14 वर्ष वयोगटातील मुली * लसीकरण केंद्रे : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे * नोंदणी : शासनाच्या यू-विन (U-WIN) पोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र हावयोगटातील मुलींनी लस घेण्याचे आवाहन केले आहे. ०००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'