जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी विभागवार वाटप करण्यात आलेला निधी, त्या निधीअंतर्गत करण्यात आलेली कामे आदी. बाबींचा सविस्तर आढाव घेत सर्व यंत्रणांनी BDS वर वितरित केलेला निधी ३१ मार्च २०२६ पूर्वी १००% खर्च करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही विभागाचा निधी समर्पित होणार नाही याची सर्व जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, अनुसुचित जाती योजनेच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी सर्व यंत्रणांना देण्यात आलेल्या निधी विषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २८२ कोटी रुपये एवढी मूळ अर्थसंकल्पीत तरतूद असून १०० टक्के निधी प्राप्त झालेला आहे. २९६ कोटी ३० लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्राप्त तरतुदीशी वितरणाची टक्केवारी ९६ टक्के एवढी असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, उप जिल्हा नियोजन अधिकारी श्री अडसूळ यांच्यासह सर्व यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'