मिशन लक्षवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 09 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागव्दारे मिशन लक्षवेध अंतर्गत प्रथम टप्प्यात कोल्हापूर येथे शूटींग व कुस्ती, कुरुंदवाड जि. कोल्हापूर येथे वेटलिफ्टिंग व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. तरी पात्र खेळाडूंनी 12 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवकसेवा चे उपसंचालक सुहास पाटील यांनी केले आहे
या उपक्रमांतर्गत प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच दि. 31 डिसेंबर 2026 रोजी वय 25 वर्षा आतील असणे आवश्यक आहे, अशी किमान अर्हता असून मागील 2 वर्षातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येईल तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेवून प्रशिक्षणार्थींची निवड अंतिम करण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटरमध्ये निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाव्दारे करण्यात येणार आहे. तरी वर नमूद केलेल्या अर्हता धारक खेळाडूंनी दि. 12 मार्च 2026 रोजी पर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, रेसकोर्स नाका संभाजी नगर, कोल्हापूर फोन 0231-2951108, येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmail.com या ईमेलवर मुदतीत अर्ज सादर करावेत,असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
०००००००
Comments
Post a Comment