कुडाळ येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनाक 11 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बजाज शोरूम, आर. एस. एन. हॉटेल समोर, कुडाळ येथे दि.13 मार्च 2026 रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 30 पदांसाठी भरती होणार असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये बजाज शोरूम, कुडाळ येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी 10वी / 12वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर पदसंख्या 10 पदे उपलब्ध आहेत. तसेच मेकॅनिक पदासाठी आयटीआय मेकॅनिक / इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा मेकॅनिक, इलेक्ट्रीकल पदसंख्या-20 पदे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एकूण 30 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर प्लेसमेंट ड्राइव्ह प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे बजाज शोरूम, आर. एस. एन. हॉटेल समोर, कुडाळ ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी Sindhudurgrojgar@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२३६२-२२८८३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'