"नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियाना"अंतर्गत कणकवली येथे चष्मे वाटपाला प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी, :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत घेण्यात आलेल्या "नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान" अतंर्गत नेत्र तपासणी व नेत्र विषयक शस्त्रक्रिया तसेच चष्मा मिळविण्याकरिता नोंद करण्यात आलेली होती. या रुग्णांना 27 फेब्रुवारी रोजी कणकवली येथे आयोजित मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबीरात चष्मे वाटपास सुरुवात करण्यात आल्याची माहिती सिएमआरएफचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप मुरकुटे, समाजसेवा अधिक्षक सुनिल कुंडगिर हे उपस्थित होते. या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची माहिती पत्रके वाटून तसेच उपस्थितांना माहिती देऊन प्रचार प्रसार करण्यात आला. जिल्हातील "नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान" अतंर्गत उर्वरित लाभार्थी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयाने चष्मे वितरीत केले जाणार आहेत. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'