मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुण व्यावी
सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी दि. 10 मार्च 2025 पूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशा प्रशिक्षणार्थी उर्वरित पाच महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक तसेच योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांनी आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी दिली आहे.
योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापना या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रूजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दि. 10.03.2025 च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रूजू करून घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी (Aadhar Verify) अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंट ला आधार लिंक आहे, तोच बँक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन DBT साठी नमूद करणे आवश्यक आहे.
सर्व इच्छूक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे, आस्थापना/नियोक्ते, उद्योजक यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच आस्थापना/नियाक्ते, उदयोजक यांनी घ्यावा.
याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अथवा 02362 - 228835 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा समन्वयक (CMYKPY) श्री. प्रितेश परब मो.नं. 7066387310, व जिल्हा समन्वयक (CMYKPY) श्री. सिध्देश घाडीगावकर मो.नं. 7263837143 यांच्याशी संपर्क साधावा.
०००००००
Comments
Post a Comment