भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 मेपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी अनु. जाती प्रवर्गासाठी सन 2024-25 करिता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्याकरिता 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे सुरु आहे. सिधुदुर्ग जिल्हयातील सर्व कनिष्ठ / वरिष्ठ व व्यावसायिक संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी आवाहन करण्यात येते की , जे अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्याथ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करुन घ्यावे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे.तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिधुदुर्ग कार्यालय (दूरध्वनी क्र.02362-228882) येथे संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केलेले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'