सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी संपर्क करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन 02-03 माजी सैनिकांची जिल्हा सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक जे जिल्हा, तालुक्यातील आजी, माजी सैनिकांच्या परिवारांची भेट घेवून त्यांना देय असलेल्या शासकीय तथा अन्य योजनांची माहिती देतात व त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करतात तसेच त्यांच्या अडी-अडीअचणी प्रसंगी आवश्यकतेनुसार गाव, तालुका, जिल्हास्तरीय प्रशासनाशी समन्वय साधून या अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतात अशा माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, आधार कार्ड यांची छायांकीत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 15 एप्रिल 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आजी ,माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पन्ती, वीरनारी, वीरमाता, वीरपिता, यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक मंडळाची स्थापना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार 5 ते 9 व्यक्तिंची जिल्हा सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती, नेमणुका करावयाची आहे. या अशासकीय सदस्यापैकी 50 टक्के शक्यतो माजी सैनिक असावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820,9322051284 वर संपर्क करावा.
००००
Comments
Post a Comment