अशासकीय सदस्य पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 मधील प्रकरण 3 मधील कलम 4 (1) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2018 मधील प्रकरण 2 मधील नियम 3 व 4 च्या अधिनराहून महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय मंडळ सिंधुदुर्ग 2 अशासकीय सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ मधील प्रकरण ३ मधील कलम ४ (१) तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील प्रकरण २ मधील नियम ३ व ४ अन्वये बाल न्याय मंडळ गठीत करण्याची तसेच मंडळाची रचना याबाबतची तरतूद आहे. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१ ला अधीन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय मंडळ, गडचिरोली व नागपूर येथील प्रत्येकी १-१ अशासकीय सदस्य व बाल न्याय मंडळ, पुणे (अतिरिक्त) येथील २ अशासकीय सदस्य असे एकूण ४ पदे वगळून उर्वरित सर्व बाल न्याय मंडळाची जिल्हातील दोन अशासकीय सदस्य पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह आयुक्तालय, पुणे यांचेकडून दि. २९/०३/२०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिराती पासून पुढील १५ दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सादर करावेत. तसेच सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या http://wedcommpune.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग पत्ता:-जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, ए-विंग, तळमजला दालन क्र १०६, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ०२३६२२२८८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'