ग्रामीण भागात आधार कॅम्पचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या आधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी सिंधुदुर्ग टपाल खात्याने ग्रामीण भागात आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग टपाल विभागाने तालुका निहाय कॅम्पचे आयोजन पुढीलप्रमाणे,
गावाचे नाव
तालुका
कॅम्पची तारीख
मळगाव
सावंतवाडी
23 एप्रिल 2025
कलमठ
कणकवली
23 एप्रिल 2025
आंबेरी
मालवण
25 एप्रिल 2025
इळये
देवगड
25 एप्रिल 2025
आजगाव
सावंतवाडी
29 एप्रिल 2025
घोणसरी
कणकवली
29 एप्रिल 2025
केरवडे (भोयाचे )
कुडाळ
30 एप्रिल 2025
वैभववाडी
वैभववाडी
30 एप्रिल 2025
०००००
Comments
Post a Comment