जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पदभरती
सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह यांच्या व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधनवार माजी सैनिक प्रवर्गातुन/ नागरी संवर्गातून खालील अशासकीय पदे भारण्यात येणार असल्याचे सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अ.क्र
पदाचे नाव
संवर्ग
मानधन दरमहा
एकुण पदे
सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी
1
सहाय्यक वसतीगृह अधीक्षक
(पुरुष)
माजी/नागरी संवर्ग
रुपये 24,875/-
1
2
पहारेकरी (पुरुष) (निवासी पद)
माजी/नागरी संवर्ग
रुपये 19,992/-
1
3
माळी (पुरुष)
माजी/नागरी संवर्ग
रुपये 12,493/-
1
4
स्वयंपाकी (महिला)
माजी/नागरी संवर्ग
रुपये 13,328/-
3
5
सफाई कामगार
माजी/नागरी संवर्ग
रुपये 12,493/-
1
माजी सैनिक विश्रामगृह, सावंतवाडी
1
पहारेकरी (पुरुष) (निवासी पद)
माजी/नागरी संवर्ग
रुपये 19,992/-
1
इच्छुक माजी सैनिक/ माजी सैनिक पत्नी यांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा ओळखपत्र आणि नागरी उमेदवारांनी २ फोटो, आधार कार्ड व बँक पासबुक या कागदपत्रांसह दिनांक १ जुन २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत भेट देऊन स्वतः अर्ज सादर करावेत. माजी सैनिक प्रवर्गातुन उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी संवर्गातुन अशासकीय पदे भरण्यात येतील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी (कामाचे स्वरुप कामाचा अवधी) दुरध्वनी क्र- ०२३६२-२२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment