िल्हा पदोन्नती समितीची सभा संपन्न

ज सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पदोन्नती समितीची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती व सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे. ग्रामपंचायत विभाग 5, बांधकाम विभाग 2, आरोग्य विभाग 6 असे एकूण 13 पदोन्नतीचे प्रस्ताव सादर केले होते. तसेच सामान्य प्रशासन विभाग 82, ग्रामपंचायत विभाग 93, शिक्षण प्राथमिक विभाग 153, बांधकाम विभाग 6 असे एकूण 334 विभागनिहाय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव सादर केले. या सभेत प्राप्त प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि प्रत्येक प्रस्तावाची छाननी करुन योग्य प्रस्तवाना मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) किशोर काळे यांनी दिली आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'