सामाजिक न्याय विभागाच्या समतादुतामार्फत विविध योजनांचा प्रबोधन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त जिल्ह्यातील सार्वजनिक लोक वस्तीच्या ठिकाणी, ग्रामीण व शहरी भागात समतादूतामार्फत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे वाचन, पथनाट्य व लघुनाटिकाव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबतचे प्रबोधन, समाज कल्याण विभगातील योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment