देवगड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात सुरक्षागृहाची व्यवस्था
सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ऑनर किलिंगपासून संरक्षण पुरवून ऑनर किलिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक, दंडात्मक उपायांच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेशित केलेले आहे. शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार या कार्यालयाच्या अधिनस्त 100 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, देवगड येथील एक खोली सुरक्षागृह म्हणून (Safe House Roome) 'तात्पुरत्या' स्वरूपात देण्यात आलेली आहे.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना ऑनर किलिंगपासून संरक्षण घेण्याची आवश्यकता भासल्यास पोलीस अधिक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग, अथवा महिला व बालविकास कार्यालय सिंधुदुर्ग. या कार्यालयांशी संपर्क साधून, सुरक्षागृहात सुरक्षिततेकरिता राहण्याचा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment