शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गासाठी सन 2024-25 करीता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी शासनाकडून 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरीष्ठ व व्यावसायिक संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येत की जे विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण दि. 31 मे 2025 अखेर करावे,विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेणेची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करुन परीपूर्ण अर्ज मंजूरीस्तव या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत समस्या अद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालय (दूरध्वीन क्र. 02362 228882) येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'