योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग सन 2025-‍26 या आर्थीक वर्षात हे महामंडळ राबवीत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्तावाबाबत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग सन 2025-‍26 या आर्थीक वर्षात हे महामंडळ राबवीत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरीता या महामंडळाच्या योजना अनुसुचित जाती व नवबौद्ध लोकांच्या स्वयंरोजगारासाठी लाभ घेऊ इच्‍छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत अर्ज स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात दाखल करावे. त्रयस्थ तसेच मध्यस्तीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे स्वरुप 1. 50% अनुदान योजना 1.प्रकल्प मर्यादा रु.50000/-पर्यंत 2.प्रकल्प मर्यादेच्या 50% ‍किंवा जास्तीत जास्त 25000/- पर्यंत अनुदान देण्यात येते. व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. अर्ज करण्यास आवश्यक पात्रता 1. अर्जदार अनुसुचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. 2. वार्षीक उत्पन्न ग्रामीण व शहरी विभागासाठी रु. 3.00 लाख एवढे आहे. 3. अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा थकबाकीदार नसावा. 4. जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-यांनी दिलेला असावा. 5. पासपोर्ट आकाराचे फोटो. 6. रेशनकार्ड,मतदार ओळखपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र,आधारकार्ड प्रत. 7. कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले 8. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. 9. व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखलेपत्र. उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स,परमिट, बॅच नंबर इ. 10. बँकेचे खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स प्रत 2. बीजभांडवल योजना 1.प्रकल्प मर्यादा 50001/-ते रु. 5 लाखापर्यत. 2.प्रकल्प मर्यादेच्या 20% बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4% द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु. 50000/- चा समावेश आहे. 3.बँकेचे कर्ज 75% देंण्यात येते.व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. 4.महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते. 5.अर्जदारास 5% सहभाग भरावयाचा आहे. 3. प्रशिक्षण योजना सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वंयरोजगार करण्याचे दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणे प्रशिक्षण फी प्रती उमेदवार प्रशिक्षणाच्या स्वरुपावरुन ठरविण्यांत येते. प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1,000/- विद्यावेतन देण्यांत येते. तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी अदा करणेत येते. अर्ज करण्यास आवश्यक पात्रता 11. अर्जदार अनुसुचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 45 वर्ष असावे. तरी वरील योजनांचा कर्जप्रस्ताव या महामंडळाच्या विहीत नमुन्यात कर्ज अर्ज वाटप व स्वीकृत कार्यालयीन वेळेत स्थळ जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'