"समता पंधरवडा" निमित्त जेष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीरचे कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व जेष्ठ नागरिक मेळावा, स्वच्छता अभियान तसेच रक्तदान शिबीराचे कार्यक्रम संपन्न झाले, असल्याची माहिती समाज काल्याण चे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या रक्तदान शिबीरामध्ये सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी रक्तदान केले, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हणले. या रक्तदान शिबीरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी एस.एस.पी.एम ब्लड बॅकेंचे वैद्यकीय अधिकारी, नर्स इतर स्टाफ उपस्थित होते. तसेच ओरोस सिध्दार्थ नगर वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जेष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व जेष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अक्ष्यक्ष बांदा जेष्ठ नागरिक सेवासंघ अन्वर खान, यांनी जेष्ठ नागरिकांनी प्रत्येक जेष्ठ नागरिक समितीमध्ये सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. ॲड अशोक रोठे यांनी जेष्ठ नागरिक कायद्या विषयी मार्गदर्शन केले. दादा कुडतरक यांनी शासन निर्णयातील प्रमुख्य मुद्यांची माहिती दिली. कणकवली प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांनी जेष्ठ नागरिक मेळाव्यात तरुणानीही सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले. जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे यानी जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आपले छंद जोपासून आनंदीत राहावे.
यावेळी जेष्ठ नागरिक मधुकर जाधव, तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी , समतादूत, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आनंद कर्पे यांनी केले.
००००
Comments
Post a Comment