फळपिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या निकषानुसार ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. परंतू फळपिकांची ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपव्दारे केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. शासन निर्णयामधील तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावर ई –पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यामार्फत मृग बहार सन 2024 मध्ये संत्रा , मोसंबी, डाळिंब,द्राक्ष (क),चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजु, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्ययामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'