समाज कल्याण कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त समाज कल्याण विभागामध्ये क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली, यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कले. प्रमुख वक्ते नागेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिक, विद्यार्थीनी, सर्व कार्यालयातील, समादूत, महामंडळाचे, जात पडताळणी विभगाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment